MP Asaduddin Owaisi : ठाकरे गट आणि एमआयएममध्ये युती होण्याची शक्यता नाही - असदुद्दीन ओवेसी - said MIM President MP Asaduddin Owaisi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 24, 2023, 9:45 PM IST

बुलडाणा : पाटण्यामध्ये मोदींविरोधात एकजूट करताना विरोधकांनी एमआयएमला निमंत्रित दिले नव्हते. त्यावरुन खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आज बुलडाण्यातील मलकापूरमध्ये आले असता त्यांनी नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसोबत युती शक्य नाही. एमआयएम, ठाकरे गटाची विचारधारा म्हणजे समुद्राचे दोन टोक आहेत. त्यामुळे ठाकरे गट, एमआयएमच्या युतीची शक्यता नसल्याचे एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. मोदींविरोधात एकजूट होण्यास तयार आहे. मात्र, त्यांनी आम्हाला बोलवायला हवे, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. पाटणा येथील सभेत मेहबुबा मुक्तींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. त्याच मेहबुबा मुक्तींचा काश्मीरातील 370 कलम हटवण्यात हात होता, असा आरोप देखील असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.