Theft has been Captured on CCTV : किराणा शाॅपी फोडून चोरी; चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद - Old Modha area of Jalna city
🎬 Watch Now: Feature Video
जुना मोढा परिसरात असलेल्या सुपर शॉपीच्या कुरलचा डग तोडून एक लाख चाळीस हजाराची रोकड व मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील जुना मोढा परिसरात ( Old Modha area of Jalna city ) असलेल्या परिवार सुपर शॉपीमध्ये कुलरसाठी ठेवण्यात आलेला डग चोरट्याने तोडून सुपर शॉपीत प्रवेश करीत सुपर शॉपीच्या काऊंटरच्या गल्ल्यात असलेली १ लाख २५ हजार ५९० रुपयांची रोकड ( One lakh and forty thousand rupees in cash have been stolen ), ९ हजार रुपय किंमत असलेले नेट राउडर, ५ हजार रुपये किंमत असलेले पॅरगॉन शुजचे १० बाॅक्स असा एकूण १ लाख ३९ हजार ५९० रुपयांची रोकड व मुद्देमालावर डल्ला मारल्याची घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडलीय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद ( theft has been captured on CCTV ) झाल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडालीय.या प्रकरणी सुपर शॉपीच्या मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत ( further investigated by the police ) आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST