Video: दुचाकीसह तरूण पडला 20 फूट खोल ड्रेनेज मध्ये; सुदैवाने गंभीर दुखापत नाही - कत्तलखाना रोड सांगली
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - चिखलामुळे दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार थेट 20 फूट खोल ड्रेनेज मध्ये जाऊन पडल्याची घटना सांगली शहरात .कत्तलखाना रोडवर, (Slaughter Road Sangli) महापालिकेच्या उघड्या ड्रेनेज (Bike Fell In to Deep Drainage) मध्ये पडून हा अपघात घडली आहे.पण केवळ दैव बलवत्तेवर दुचाकीस्वार खोल खड्डयात पडूनही सुखरूप बाहेर आला.त्याला कोणतेही गंभीर दुखापत झाली नाही,विनायक कांबळे असं या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात संताप व्यक्त केला आहे.उघड्या जीवघेणे असणाऱ्या ड्रेनेजच्या बाबतीत कोणतीच खबरदारी पालिकेच्यावतीने घेण्यात आली नाही.त्यामुळे हा अपघात घडला आहे,त्यामुळे तातडीने हे ड्रेनेजचे सर्व कामे पूर्ण करावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST