Viral Video : परश्याला मागे बसवत आर्चीची लग्न मंडपात थेट बुलेटवर एन्ट्री - Haveli taluk

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 10, 2023, 4:14 PM IST

पुणे : हवेली तालुक्यातील सांगवी सांडस या गावात लग्न सोहळ्या दरम्यान मुलगा, मुलीने थेट घोड्या ऐवजी बुलेट वरून लग्न मंडपात एंट्री केल्याने याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे. हवेली तालुक्यातील सांगवी सांडस या ठिकाणी एका शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नातभेट म्हणून एक चार चाकी, एक बुलेट, एक दुचाकी भेट दिली आहे. त्यामुळे या भागात या लग्नाची विशेष चर्चा आहे. 'सैराट' गर्ल आर्चीची बुलेटची क्रेझ सध्या जोरात आहे. सैराट चित्रपटानंतर अनेक मुलीत बुलेटबद्दल क्रेज पहायला मिळत आहे. मात्र, अशातच पुण्यातील सांगवी सांडस गावात लग्नमंडपात नवरीने बुलेट चालवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत नवरी बुलेट चालवत असुन नवरदेव तीच्या मागे बसला आहे. शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील शितोळे, धुमाळ या दोन कुटुंबांचा विवाह सोहळा चर्चेत आला आहे. कारण नववधूने आपल्या पतीला पाठीमागून बुलेटवर बसवून लग्नमंडपात प्रवेश केल्याने सगळीकडे चर्चा आहे. नवरीने मराठमोळा साज शृंगार परिधान करत थेट बुलेटवर एन्ट्री मारली. त्यामुळे पाहुणेमंडळी पाहुणच बुचकळ्यात पडली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.