Car Fire : धावत्या कारने घेतला पेट; चालक वाचला, पाहा व्हिडिओ - धावत्या इंडिगो कारने घेतला पेट
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: भारतात इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसापासून देशाच्या विविध भागातून इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या, बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत आहेत. नागपुरच्या रामदासपेठ भागात धावत्या टाटा इंडिगो कारला आग लागण्याची घटना घडली आहे. भर रस्त्यात कारने पेट घेल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. सुदैवाने कार चालक सुरक्षित आहे. कारला आग लागल्याची माहिती समाजातच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्यनारायण अक्षरशः आग ओकू लागला आहे. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस पर्यत जात आहे. आग लागण्याच्या घटना घडण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळी इंडिगो कार रामदासपेठकडून सीताबर्डीकडे जात असताना, अचानक कारच्या इंजिनमधून अगोदर धूराचे लोट निघात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखूत गाडी थांबवूली आणि गाडी बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही वेळात गाडीने पेट घेतला.