Video एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, दिपक केदार यांची मागणी - दिपक केदार यांची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करणाऱ्या एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह Dnyaneshwar Singh यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी करत आझाद मैदानावर Azad Maidan ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. आझाद मैदान येथे समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आत्मसन्मान अनुसूचित जाती बचाव आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश्वर सिंग यांना निलंबित करा, त्यांच्यावर ऍट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. संविधान झिंदाबाद, लोकशाही झिंदाबाद असे म्हणत समीर वानखेडे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्ञानेश्वर सिंह यांना बडतर्फ करा अशा घोषणा आझाद मैदानावर या आंदोलनादरम्यान देण्यात आल्या. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, केवळ एका दलित अधिकाऱ्याकडे मोठ्या केसचा तपास सुरु होता. त्याचा राग मनात ठेऊन व्हिजिलन्स कमिटी तयार करण्यात आली आणि या कमिटीचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे यांच्या चौकशीदरम्यान तुम्ही इतके महागडे कपडे का घालता असा प्रश्न त्यांना सिंह यांनी विचारला. त्यावर वानखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील असेच कपडे घालत असे उत्तर दिल्यानंतर सिंह यांनी अवहेलना करत वानखेडे यांचे मन दुखावणले. एका दलित अधिकाऱ्याला अशी वागणूक देणाऱ्या ज्ञानेश्वर सिंह यांची हकालपट्टी करा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST