Sushma Andhare News: संकट आल्याने मुख्यमंत्री देवाचा धावा करायला गेले- सुषमा अंधारे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

नांदेड : रिफायनरीबाबत उध्दव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. विकास करताना कोणालाही विस्तापित करु नका, अशी उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे. फडणवीस यांनी 'ध' चा 'म' करु नये. या विषयावरुन वातावरण भ्रमित करु नये, अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र ते बेपत्ता नसून संकट आल्याने देवाचा धावा करायला गेले, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली. त्या नांदेडमध्ये बोलत होत्या. शिंदे यांना पूजा अर्चा करायची सवय आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक देवाच्या पूजा केल्या. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार, अशी चर्चा आहे. असा संकटकाळ आला की माणूस देवाकडे धाव घेतो, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. राजीनामा देण्याच्या केंद्राच्या सूचना, नागपुरमध्ये फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणुन लागलेले बॅनर, खारगर दुर्घटनेवरील दबाव यामुळे उमेद शोधण्यासाठी ते गेले असावे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. आगामी काळातील सर्वच निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार, असे फडणवीस म्हणाले. मात्र ते नेहमी वक्तव्य बदलतात. राष्ट्रवादी सोबत कधीही युती नाही, असे ते बोलले होते पण पहाटेचा शपथविधी केला होता. वक्तव्य बदलण्यात फडणवीस माहीर आहेत. शिंदेच्या नेतृत्त्वात निवडणुक लढणार, असे म्हणणारे फडणविस यांनी उत्तर द्यावे की, गुजरातच्या वृत्तपत्रात शिंदे यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर भाजपाची भुमिका काय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.