Ahmednagar Crime News: अहमदनगरमध्ये समाजकंटकांकडून पुन्हा दगडफेक; दोन गटात राडा, दोन मोटरसायकल जाळल्या - दगडफेकीत दोन मोटरसायकल जाळण्यात आल्या

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 5, 2023, 1:31 PM IST

अहमदनगर : शहरातील गजराज नगर येथे किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. दगडफेकीत दोन मोटरसायकल जाळण्यात आल्या तर एका चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली आहे. मुकुंद नगर परिसरात देखील दगडफेक झाली होती. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. दगडफेक नेमकी कशामुळे सुरू झाली याचा तपास पोलीस करत आहेत. येणाऱ्या काळात सण, उत्सव आहेत. त्यातच काही समाज विघातक वृत्तीची माणसे जर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर, त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करायला हवा अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.