आफ्रिकन चित्ते भारतात आणण्यासाठी विशेष विमान नामिबियात, पाहा हे विमान आणि वाचा वैशिष्ठ्ये

By

Published : Sep 15, 2022, 3:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

नामिबिया - नामिबियामधून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत (cheetah reintroduction project). त्यासाठी विशेष विमान तयार करण्यात आले आहे. आफ्रिकन चित्ता वाहून नेणाऱ्या बोईंग 747 जंबो जेट विमानाच्या मुख्य केबिनमध्ये सुरक्षित पिंजरे ठेवण्यासाठी बदल करण्यात आला आहे. यामध्ये पशुवैद्यकांना राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. हे विमान एक अल्ट्रा-लाँग रेंज जेट आहे. ते सलग 16 तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे (Special plane lands in Namibia). हे विमान इंधन न भरता थेट नामिबियाहून भारतात जाऊ शकते. हे विमान Action Aviation या प्रमुख विमान दलाली कंपनीने खरेदी केले होते. अॅक्शन एव्हिएशनचे अध्यक्ष कॅप्टन हॅमिश हार्डिंग, डॉ. लॉरी मार्कर यांचे मित्र आणि द एक्सप्लोरर्स क्लबचे सहकारी सदस्य यांनी या फ्लाइटचे वैयक्तिकरित्या व्यवस्थापन केले आहे. एक्सप्लोरर्स क्लबने हे महत्त्वाचे प्राणी संवर्धन अभियान flagship mission म्हणून केले आहे. डॉ. लॉरी मार्कर आणि हमिश हार्डिंग हे चित्ताच्या पहिल्या उड्डाणावर एक्सप्लोरर्स क्लबचा ध्वज क्रमांक 118 घेऊन जातील. हे विमान संयुक्त अरब अमिरातीच्या इक्विलिन इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या मालकीचे आहे, जे त्याच्या ताफ्याचे जगभरातील चार्टर चालवते.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.