केदारनाथमध्ये हिमवृष्टीला सुरुवात, बाबांचं धाम बर्फाच्या चादरीनं झाकलं; पाहा विहंगम दृष्य
🎬 Watch Now: Feature Video
केदारनाथ (उत्तराखंड) : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये गेल्या २४ तासांपासून सतत हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे केदारनाथ धाममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्बांधणीच्या कामावर परिणाम झालाय. येथे प्रचंड हिमवृष्टीमुळं काम थांबवावं लागलं. केदारनाथ धाममध्ये सध्या सुमारे १ फूट बर्फ साचला आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे बंद झाल्यानंतरची ही पहिलीच हिमवृष्टी आहे. दरवाजे बंद होण्याच्या काही दिवस आधी हिमवर्षाव झाला होता. धाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील पुनर्बांधणीचं कामही सुरू होतं, जे हिमवृष्टीमुळे थांबलंय. सध्या धाममध्ये सतत हिमवृष्टी सुरू आहे. तेथे सध्या मोजकेच मजूर आणि संत उपस्थित आहेत. हिमवृष्टीमुळे केदारनाथ खोऱ्यातही थंडी वाढली आहे. बाबा केदारनाथचे दरवाजे यावर्षी १५ नोव्हेंबरला बंद झाले होते. पाहा हा व्हिडिओ.