Silver Crown Theft : मंदिरात देवाचं दर्शन घेऊन चोरला चांदीचा मुकूट, पहा व्हिडिओ - Silver Crown Theft in Sri Krishna temple

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 8:26 PM IST

नाशिक Silver Crown Theft : पंचवटी परिसरातील हनुमान मंदिरातील कृष्ण मंदिर गाभाऱ्यात चांदीचा मुकुट चोरी झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. चोरट्यानं आधी भगवान श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. नंतर संधी मिळताच त्याने कृष्ण मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरून नेलाय. मंदिरातील श्री कृष्ण मूर्तीवरील मुकुट चोरणाऱ्या संशयिताच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या होत्या. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पंचवटी पोलिसांनी संशयित किरण गांगुर्डे याला शिताफीनं ताब्यात घेतलंय. चांदीचा मुकुट चोरी करणारा संशयित हा गणेशवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. यानुसार पंचवटी पोलिसांनी सापळा रचत संशयित किरण गांगुर्डे याला शिताफीनं ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतल्यानंतर अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 150 ग्रॅम चांदीचा 15 हजार रुपये किंमतीचा मुकुट मिळून आला. त्याला पोलिसांनी अटक केली असून संशयताची चौकशी सुरू आहे. (Sri Krishna temple Nashik) 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.