Shinde Group Dussehra Melawa Thane : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला गर्दीसाठी श्रमजीवी संगठनेचे कार्यकर्ते हजर, सकाळपासून जमतेय गर्दी - Shinde Group Dussehra gathering in Thane

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 5, 2022, 3:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ठाणे : सभेसाठी होणारी गर्दी कशा रीतीने केली जाते याचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रत्यय ठाण्यात पाहायला मिळाला आहे. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मजबूत समजली जाणारी श्रमजीवी संघटना हिच्या कार्यकर्त्यांना देखील बीकेसी येथील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी Shinde Group Dussehra gathering BKC Thane हजर राहण्यास सांगितले गेले Shramjivi Sangathan activist in Dussehra Gathering आहे. बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आदिवासी नेते विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने पाठिंबा दिला आहे. याचमुळे बीकेसीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील कार्यकर्ते जात आहेत. प्रत्यक्षात ठाण्यातील आनंदनगर चेक नाक्यावरती या परिस्थितीचा आढावा घेतला असता हे कार्यकर्ते आपल्याला कुठे जायचंय, कोणाची सभा आहे, कोणाची मिटींग आहे हे देखील सांगत नाहीयेत. कारण त्यांना आपण कोठे जात आहोत याची कल्पनाही देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत गर्दीचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांचा वापर केला जातोय, हे चित्र पाहायला मिळत आहे. श्रमजीवी संघटनेकडून विभागवार बसेस या बीकेसीच्या मैदानात हजर राहण्यासाठी देण्यात आलेले आहेत. ठाण्यातल्या आनंद नगर चिकनाक्यावर मिळालेली ही बस पडघा परिसरातील होती. या परिसरामध्ये एक बस देण्यात आली होती. या बसेसमध्ये बसलेले कार्यकर्ते सकाळी आपल्या घरूनच नाष्टा करून निघाले आणि पुढे जेवणाचं काय तर ते पुढे मिळणार आहे असं आश्वासनही त्यांना दिलेल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.