Rajan Salvi : एसीबीच्या नोटिसीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया, तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार - आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
Rajan Salvi रत्नागिरी शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक Vaibhav Naik यांच्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी Rajan Salvi यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau ACB नोटीस बजावल्यानंतर परत एकदा दबावाच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले आहे. आपण मातोश्रीशी एकनिष्ठ असल्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या नोटिशीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST