Ashish Jaiswal On Ministership : आमदार आशिष जयस्वाल मंत्रिपदाच्या शर्यतीत; म्हणाले, माझा नंबर यावेळेस... - आशिष जायस्वाल यांची मंत्रिपदाविषयी मत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 8, 2023, 10:24 PM IST

नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हे सांगता येत नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी केली आहे. दरवेळी मंत्रिपदाच्या शर्यतीत माझे नाव आघाडीवर दिसते. मात्र, दरवेळेस मंत्रिपद मला हुलकावणी देत आहे. यावेळी तरी मंत्री व्हावे अशी इच्छा त्यांनी दाखवली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होईल व मंत्रिपद देताना आमदारांची गुणवत्तेवर निवड झाली पाहिजे, रीजनल समतोल लक्षात घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढीलवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात-लवकर झाला पाहिजे, असे आता अनेकांना वाटू लागले आहे. आता केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे आज भाष्य करणे आमच्या हातात नाही. आमचे तीनही नेते यासंबंधी निर्णय घेतील असे आशिष जयस्वाल म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसारखे तीन अनुभवी नेते आमच्या पाठीशी आहेत. बेस्ट टीम तयार झाली आहे. ते जास्तीत जास्त सरकारला गतीने पुढे नेणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने निधी वाटपात प्रचंड असमतोल निर्माण केला होता. त्याविरुद्ध मी आवाज बुलंद केला होता. आता तीन पक्ष एकत्र सरकार चालवत आहेत. परवाच्या बैठकीत आम्ही हा विषय मांडला आहे की, यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना सोबत घेऊन दीर्घकाळ एकमेकांसोबत राहायचे असेल तर कार्यपद्धती निश्चित झाली पाहिजे. त्यामुळे आता निधी वाटपामध्ये सम-समान पद्धतीने सर्व आमदारांना सहकार्य मिळेल आणि सर्व आमदारांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता सरकार घेईल असा विश्वास आशिष जायस्वाल यांनी व्यक्त केला आहे. निधी वाटपामध्ये पळवा-पळवी होणार नाही कोणावर अन्याय होईल असे वाटत नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.