Shivsena Activist Celebration : राणा दाम्पत्यांनी माघार घेतल्यानंतर अमरावतीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष - Shivsena Activist Celebration in front of Rana's House
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - गेल्या दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईतल्या त्यांच्या खार येथील निवास्थानी आहेत. त्यांनी आज सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर पोहचून हनुमान चालीसा वाचणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. दरम्यान, आता हे आंदोनल मागे घेत असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. रविवारी पंतप्रधान मुंबईत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्यात कायदा सुरक्षेला धोका नको म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST