बीड विधानसभा जागेवर शिवसंग्राम पक्षाचा दावा - बीड विधानसभा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 30, 2023, 10:20 PM IST
बीड Jyoti Mete : शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी आगमी निवडणुकांबाबत वक्तव्य केलंय. दिवंगत विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली व्यसनमुक्ती जनजागृती रॅली शनिवारी बीडमध्ये काढण्यात आली. त्यावेळी डॉ. ज्योती मेटे बोलत होत्या. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करुन आगामी निवडणुकांबाबत ठरवेल. कुणाला पाठिंबा द्याचा, की स्वतंत्रपणे लढायचे? याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं मेटे यांनी म्हटलंय. मात्र, बीड विधानसभेची जागा शिवसंग्रामला हवी आहे. कारण मागच्या वेळी दिवंगत नेते विनायक मेटे यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळं बीडची जागा आम्हाला हवी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी दिलीय. त्याचवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना मेटे साहेबांची उणीव जाणवत आहे. तुम्ही उभारलेला लढा यशस्वी, व्हावा हीच आमची प्रामाणिक इच्छा असल्याचं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.