Shivsainik Aggressive in Yavatmal : रामदास कदमांच्या फोटोला शिवसैनिकांनी जोड्याने बडविले - slogans against Ramdas Kadam
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16439859-thumbnail-3x2-yawatmal.jpg)
शिवसेनेत अनेक सन्मानाची पदे भूषविलेले आणि आता थेट ठाकरे परीवाराबद्दल अवमानजनक वक्तव्य करणा-या गद्दार रामदास कदमांच्या फोटोला आज संतप्त शिवसैनिकांनी जोड्याने बडविले. यवतमाळच्या दत्त चौकात शिवसैनिकांनी एकत्र येऊन रामदास कदमांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करुन आपला संताप व्यक्त ( Offensive statement on Thackeray family ) केला. शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम ( Shiv Sena rebel leader Ramdas Kadam ) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज यवतमाळच्या दत्त चौकात शिवसेनेच्या वतीने रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात ( slogans against Ramdas Kadam ) आल्या. गद्दार तसेच मंदबुध्दी असे लिहीलेले पोस्टर शिवसैनिकांनी जोडयाने बडविले. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांच्या नेत्रृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST