Dance Video Viral : गौरव मोरे आणि खासदार सुजय विखे यांचा वन टु का फोर...फोर टू का वन.... - MP Sujay Vikhe
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डीत तीन दिवसांचे महापशुधन एक्सपो 2023 च्या समारोपामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांचा वन टू का फोर, फोर टू का वन गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राज्यसरकारच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डीत तीन दिवशीय महापशुधन एक्सपो 2023 आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसात धार्मिक, सांस्कृतिक, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापशुधन एक्स्पो पशुसंवर्धन विभागामार्फत महापशुधन एक्सपो भरविण्यात आला असला तरी त्याच्या सर्व आयोजनाची जबाबदारी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खासदास सुजय विखे पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डीत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या महापशुधन एक्सपो 2023 चा काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थिती समारोप करण्यात आला. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे हास्य कलाकर या कार्यक्रमात सुदेश भोसले यांनी राम लखन चित्रपटातील गायलेल्या वन टू का फोर फोर टू का वन या गाण्यावर खासदार सुजय विखे आणि गौरव मोरे यांनी डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.