Shirdi Saibaba Sansthan News : विद्यार्थ्यांचे साई संस्थान विरोधात 'या' मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 18, 2023, 4:20 PM IST
अहमदनगर Shirdi Saibaba Sansthan News : शिर्डी साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या साई निवास अतिथीगृहा समोर मागील तब्बल दोन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. (Shirdi Saibaba Sansthan Students Protest) देशातील दोन नंबर आणि राज्यातील एक नंबरचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांच्या मुला-मुलींसाठी शिर्डीत (Shirdi Saibaba Sansthan) ज्युनियर आणि सिनियर कॉलेज चालवले जाते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या कॉलेजमध्ये शिक्षक कमी आहेत. ग्रंथालय आहे पण पुस्तके नाही, क्रीडा मैदान नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारी प्राचार्य असल्याने तातडीने प्राचार्य आणि शिक्षकांची ( Shirdi Students Protest) भरती साई संस्थानने करावी. सध्या प्रभारी असलेले प्राचार्य यांची खुर्ची खाली करावी आणि नवीन प्राचार्य भरती करावी, (Sai Sansthan Teacher Recruitment) अशा अनेक मागण्यांना घेऊन साईबाबा संस्थानच्या सिनियर कॉलेजेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी साई संस्थानच्या साई अतिथीगृह निवास समोर ठिय्या आंदोलन केले. साई संस्थानच्या वतीने गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्षक भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. आज अनेक शिक्षक मुलाखातीसाठी आले. मात्र, विद्यार्थ्यांनी या शिक्षकांना मुलाखातीसाठी जाऊ न देता, या शिक्षकांबरोबर प्राचार्य यांचीही भरती करावी ही मागणी केली.