Shinde group banner उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा.. शिंदे गटाकडून पुण्यात बॅनरबाजी - Single mention of Uddhav Thackeray

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 31, 2022, 1:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी तसेच विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला सरकार स्थापन करताना नंतर 50 खोके आणि आत्ता राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ लागल्याने विरोधक हे आक्रमक होत सत्ताधारी शिंदे सरकारवर टिका करत आहे. अशातच पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांचा एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पुणे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असून उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा असे बॅनरवर लिहून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. राज्यातील उद्योगधंदे बाहेर जाण्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप या बॅनर द्वारे करण्यात आला आहे. या बॅनर नंतर आता आणखी वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.