"स्वतःला पक्षप्रमुख म्हणणारे आता घटनाबाह्य झाले", शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - बाळासाहेब भवन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 11, 2024, 8:28 AM IST
मुंबई Balasaheb Bhavan : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी अखेर जवळपास दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला. विधानसभेचे अध्यक्ष अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जवळपास दीड तास निकालाचं वाचन केलं. त्यानुसार 'शिवसेना' ही एकनाथ शिंदे यांच्याकडंच असेल, असा निकाल दिला. तसंच, 16 आमदारांपैकी ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात आलं नाही. या निर्णयानंतर शिंदे शिवसेना पक्षाचं कार्यालय अर्थात बाळासाहेब भवन येथे भव्य आतिषबाजी, फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी लोकशाहीचा विजय झाल्याचं म्हटलंय. आजचा निकाल घराणेशाहीच्या विरोधातला निकाल आहे. स्वतःला पक्षप्रमुख म्हणणारे घटनाबाह्य झाल्याचा टोलाही त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.