Shasan Aplya Dari : 'शासन आपल्या दारी आलं, मात्र गावात कचरा करुन गेलं...' असं का म्हणताय काकडीचे ग्रामस्थ, पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 7:52 AM IST

अहमदनगर : शिर्डी विमानतळाजवळील काकडी गावात 'शासन आपल्या दारी' (shasan aplya dari yojana programme ) हा कार्यक्रम नुकताच पार पडलाय. या कार्यक्रमाला मान्यवरांबरोबरच तीस हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित होते. या लाभार्थ्यांना प्लास्टिकच्या ताटात जेवण देण्यात आलं होतं. कार्यक्रम झाल्यानंतर विमानतळाजवळच मोकळ्या मैदानात वापरलेली ही ताटे तशीच पडून आहेत. कार्यक्रमास सहा दिवस झाले, हा प्लास्टिकचा कचरा या ठिकाणी तसाच पडून आहे. त्यामुळं काकडी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलीय. कोपरगाव तालुक्यातील काकडी हे छोटसं गाव आहे. मात्र, या ठिकाणी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं गेल्यानं हे गाव जगाच्या नकाशावर आलंय. लहान ग्रामपंचायत असल्याने काकडी ग्रामपंचायतकडे पुरेसा निधी नाही. त्यात विमानतळ उभारणीनंतरचा एमएडीसीकडुन ग्रामपंचायतला येणारा सुमारे सात कोटीचा निधीही गेल्या चार वर्षांपासून थकलाय. हा निधी देण्याचं केवळ सरकारकडून आश्वासनचं दिलं जातंय, असं ग्रामस्थ म्हणतात. काकडी ग्रामपंचायत हद्दीत पसरलेला कचरा गोळा करण्यासाठी निधी नाही. विमानतळाच्या गावात घंटागाडीही नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.