Sharad Pawar supporters agitations : शरद पवार यांच्या राजीनाम्या विरोधात कार्यकर्त्यांची एकजूट - छगन भुजबळ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 5, 2023, 6:16 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची निवृत्ती जाहीर केल्यापासून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयावर अजिबात खुष नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर पवार यांच्यावर कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी करण्यास सुरुवात केली. नेते तर पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यावर अक्षरशः रडले. त्यांनी पवारांच्या समोरच हा निर्णय लगेच मागे घ्यावा अशी विनंती केली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता. त्यानंतर पवारांनी आपल्याला दोन दिवसांचा वेळ द्यावा असे सांगितले. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या या कार्यक्रमानंतर आजपर्यंत कार्यकर्ते आणि नेत्यांची रीघ शरद पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी लागली आहे. लोक विविध माध्यमातून पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. कोण आपल्या रक्ताने पत्र लिहीत आहे, तर कोण बॅनर लावत आहे, तर कोण आत्मदहनाच्या प्रयत्नासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. सगळ्यांचे सांगणे एकच आहे की शरद पवार यांनी त्यांचा निवृत्तीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मागे घ्यावा. आज पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली यावेळी पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा या विनंतीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याची कल्पना शरद पवार यांना दिल्याची माहिती नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.