RSS Mohan Bhagwat स्वस्त आणि उत्तम चिकित्सा उपलब्ध करून देण्याचं सामर्थ्य केवळ आयुर्वेदात, सरसंघचालक - Sarsangchalak Mohan Bhagwat

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 12, 2022, 7:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

नागपूर संपूर्ण जगात आयुर्वेदाला आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. पुढील 25 वर्षात आयुर्वेद शास्त्राची ख्याती जगभरात व्हावी यासाठी संकल्प करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत RSS Mohan Bhagwat यांनी केले आहे. ते नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत बोलत होते. आयुर्वेदिक आंतरराष्ट्रीय परिषद म्हणजे एका प्रकारे शास्त्रार्थ कुंभ आहे. विचार मंथनातून समाजाला पुढे नेण्याची दिशा कळते. गेल्या 25 वर्षांच्या काळात घेतलेल्या परीश्रमामुळे आज आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहे. पण आज ज्या गुणांमुळे इथपर्यंत पोहचलो त्या गुणांचे जतन करण्याची गरज असल्याचे, ते म्हणाले आहेत. आयुर्वेदाला लोकाश्रय प्राप्त आहे. आयुर्वेदाला एका दिशेने नेताना स्वस्त आणि उत्तम चिकित्सा उपलब्ध झाली पाहीजे. पण ती चिकित्सा घेण्याची वेळ कमीत कमी इतके स्वस्थ लाभावे, यासाठी आयुर्वेदा शास्त्राशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.