thumbnail

भाजपा हा पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, खा. संजय राऊतांचा हल्लाबोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 6:31 PM IST

सोलापूर Sanjay Raut On BJP Strategy : राम मंदिरावर भाजपा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. भाजपा हा एक पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, असे म्हणत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (BJP Event Management Company) रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेताना खासदार संजय राऊत यांनी भाजपा ही ढोंगी पार्टी आहे. (Sanjay Raut Solapur PC) तो राजकीय पक्ष नसून टोळी आहे. राजकीय पक्ष असे वर्तन कधी करतात का? वाजपेयी-अडवाणींच्या काळात भाजपा हा विचाराधारा जोपासणारा पक्ष होता. आज तो नाही. आम्ही त्यांना राजकीय पक्ष मानत नाही. ही एक मोदी-शाह यांची टोळी आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. (Sanjay Raut About Ram Mandir)

भाजपाने गुढ्यांवर 'हे' लिहिलं पाहिजे: राम मंदिराच्या मुद्द्यांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपा राम मंदिराच्या उद्घाटनावर वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे. गुढी उभारत आहेत. राऊतांनी भाजपाला सल्ला दिला की, तुम्ही राम मंदिराच्या आनंदात ज्या गुढ्या उभारणार त्यावर आम्ही अच्छे दिन आणू शकलो नाहीत असे लिहा. भाजपाने नवीन पंचांग निर्माण केलंय का, असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे. 

राम मंदिर भाजपाची जहागीर नाही : राम मंदिरावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. राम मंदिर हे काही भाजपाची जहागीर नाही. भाजपा रामावर मालकी दाखवत असेल तर हे रामाचं अवमूल्यन आहे. राम मंदिर बांधत आहे, हा अविस्मरणीय क्षण आहे. राम हे फक्त भाजपाचे नसून जगातील सर्व जणांचे प्रेरणास्थान आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.