Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वर कसा झाला अपघात? बचावलेल्या बालकानं दिली धक्कादायक माहिती - Shared Experience How Exactly Accident Happened

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 3:38 PM IST

छत्रपती संभाजीनगर (वैजापूर) : Samruddhi Mahamarg Accident : बुलढाणा अपघातानंतर पुन्हा वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. वैजापूर अपघातानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी आता आरोप- प्रत्यारोप करायला सुरुवात केलीय. समृद्धी महामार्ग जलद आणि सुरक्षित महामार्ग (Samruddhi Highway) असला तरी सततच्या अपघातांमुळे उद्घाटनापासून तो चर्चेत आहे.  

'या' कारणामुळं झाला अपघात : वैजापूर तालुक्यात भीषण अपघात (Accident News) झाला आणि बारा जण जागीच ठार झाले. चौथ्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकवर मिनी बस मागून (Accident on Samruddhi Mahamarg) धडकली. अपघातामध्ये बचावलेल्या लहान मुलानं जे काही सांगितलं ते गंभीर आहे. अपघातात बचावलेल्या लहान मुलानं सांगितलं की, आरटीओचे अधिकारी ट्रकचा पाठलाग करत होते. ट्रकला या अधिकाऱ्यांनी अचानक थांबवल्यानं मिनी बस ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर सर्वजण नाशिकचे असल्याची माहिती समोर येत आहे.  

मंत्र्यांची घटनास्थळी भेट : राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अपघातस्थळी पाहणी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अंबादास दानवे यांच्यानंतर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) आणि सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनीही अपघातस्थळी भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.