Gautami Patil V Indorikar Maharaj : गौतमी पाटील यांनी लावणी संस्कृती बिघडविली, इंदुरीकर महाराजांना...संत साहित्यिक सदानंद मोरेंची टीका
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: आपल्या लावणीने महाराष्ट्रभर गाजत असलेले गौतमी पाटील आणि कीर्तनामधून प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर, या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी वाद सुरू झाला आहे. हा वाद मानधनावरून सुरू झाला होता. त्यानंतर गौतमी पाटीलवर मोठ्या प्रमाणात लावणी बिघडवली म्हणून टीका झाली. आता ज्येष्ठ संत साहित्यक सदानंद मोरे यांनी सुद्धा गौतमी पाटील आणि निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे एका कार्यक्रमात सांगितलेला आहे. दोघांनाही त्यांच्या क्षेत्रामध्ये लोक नाव ठेवतात. इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील दोघांनीही आत्मपरीक्षण करावा असा सल्ला सदानंद मोरे यांनी दिला आहे.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एका कीर्तनामध्ये आम्ही मानधनात पाच हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडला असा आरोप होतो. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये मोजले जातात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो, आम्हाला कुठल्याच प्रकारचे कधीही संरक्षण नसते अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केले होती. याला प्रत्युत्तर सुद्धा गौतमी पाटील यांनी दिले होते. त्याचे सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांवर खूप टीका झाली होती.आता या दोघांनाही आत्मपरीक्षणाचा सल्ला सदानंद मोरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात दिलेला आहे. ते म्हणाले की गौतमी पाटील यांनी लावणी संस्कृती बिघडवली तर, वारकरी संप्रदायातील जी लोक आहेत ते सुद्धा इंदुरीकर महाराजांना नाव ठेवतात. गौतमी पाटील हिच्या लावणीवरती यापूर्वीसुद्धा प्रचंड प्रमाणात या क्षेत्रातील लोकांकडून टीका होत आहे. आता त्याचबरोबर विचारवंत लोक सुद्धा टीका करत असल्याचे आता बोलले जात आहे.