आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकर यांना अटक, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 19, 2024, 7:44 AM IST
मलकापूर (बुलढाणा) Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आज रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, गुरुवारी रात्रीच रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक करून मेहकर इथं नेण्यात आले. यानंतरही रेलरोको आंदोलन होणारच या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम होते. त्यानंतर रविकांत तुपकर यांची पत्नी शर्वरी तुपकर आणि अनेक कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल रोखण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना मलकापूर रेल्वे गेटवरच अडवलंय. त्यामुळं आंदोलन करण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे गेटवरच जोरदार घोषणाबाजी सुरू केलीय. सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदेलकांनी केलाय. तसंच मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.