Raskasha bandhan 2023 : सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी पाठविल्या ५ हजार राख्या; शाळेचा स्तुत्य उपक्रम - Raskasha bandhan 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 10:15 AM IST

बुलढाणा : ल चिखली येथील विद्यानिकेतन शाळेने यावर्षी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांना रक्षाबंधनासाठी सुट्टी मिळत नसल्याने व ते देशाच्या संरक्षणासाठी व्यस्त असल्याने या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांना ५००० राख्या पाठविल्या आहेत. या राख्या बनवण्याचे काम गेल्या तीन दिवसापासून सुरू होते. या शाळेतील चिमुरडे विद्यार्थी आपल्या हाताने सुंदर अशा राख्या बनविल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध योजना या राख्यांच्या माध्यमातून प्रतिबिंबित करण्याचा अनोखा उपक्रम या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. अतिशय सुंदर अशा राख्या या विद्यार्थ्यांनी बनवल्या असून या राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.   रक्षाबंधनाकडे भावा बहिणीच्या रक्षणाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व योजनांची माहिती व जनजागृती सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याकरिता एक अभिनव मार्ग या सणानिमित्त विद्यार्थ्यांनी निवडला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.