Election War Video : साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढण्याचे रामराजे निंबाळकरांचे संकेत, पाहा व्हिडिओ - Ramraje Nimbalkar
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : साताऱ्यातून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिले आहेत. अजित पवार, जयंत पाटलांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचा योग्य तो मान राखला जाईल, असेही रामराजे म्हणाले. मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय विधायक संमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामराजेंनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविण्याचे असल्याचे संकेत दिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजे-उदयनराजे यांच्यात रंगलेला कलगीतुरा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे. दिल्लीला आम्हालाही जाता येते. आम्ही जिल्ह्यात नसल्यामुळे अनेकांच्या कॉलरवर होतात, असा टोला रामराजेंनी लगावला होता. आता तर रामराजेंनी उदयनराजेंविरोधात लढण्याचे संकेतच दिले आहेत.