'एनडीए'मध्ये प्रकाश आंबेडकर आले तर मी मंत्रिपद सोडेल - केंद्रीय मंत्री रामदास आठवले - Ramdas Athawale
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 15, 2024, 10:48 PM IST
अकोला Ramdas Athawale on Prakash Ambedkar : रामदास आठवले यांचा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याप्रति प्रेम पुन्हा उफळून आल्याचं दिसून येतय. आठवले यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे वेगवेगळे पक्ष आहे. त्यांनी ते एकत्र करावे आम्ही पण त्यांना साथ देऊ, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं. अकोला लोकसभेच्या जागेवर आपण दावा करणार नाही. तर ही जागा आपण प्रकाश आंबेडकरांसाठी सोडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आम्ही राज्य सरकारमध्ये जागा मागू, अकोला जागेसाठी आम्ही कधीच दावा करणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे म्हणत ते एनडीएमध्ये आल्यास आपण आपली जागा तसेच मंत्री पदही त्यांना देण्यास तयार असल्याचं आठवले यांनी सांगितलंय. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 12-12-12-12 चा दिलेला फरमूल्याला आठवले यांनी पाठिंबा दिलाय.