Ram Temple Ayodhya : राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात; दरवाजांसाठी आणले महाराष्ट्रातून लाकूड - राम मंदिर बांधकामासाठी लाकूड महाराष्ट्रातून

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 22, 2023, 4:38 PM IST

अयोध्या : मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांचे पवित्र जन्मस्थान असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. रामललाला मंदिरात बसवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंदिराच्या तळमजल्यावरील संकुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. छतही तयार आहे. आता गर्भगृहात फरशी बसवण्याचे काम बाकी आहे. या भागात मंदिराच्या दरवाजाच्या बांधकामासाठी महाराष्ट्रातून लाकूडही आले आहे. नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातून आणले लाकूड - जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर भगवान रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या दृष्टीने बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिटेनिंग वॉलचे काम पूर्ण झाले आहे. भिंतीचे काम सध्या सुरू आहे. प्रभू रामललाच्या गर्भगृहात फरशी तयार करणे आणि दरवाजे बसवण्याचे काम प्रलंबित आहे. मंदिराच्या आवारात लावल्या जाणाऱ्या दरवाजांसाठी ७० टक्के लाकूड महाराष्ट्रातील शिरपूर येथून आले आहे. यातून भव्य दरवाजे बनवले जात आहेत. तळमजल्याच्या बांधकामाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा -  Ram Mandir Photos : राम मंदिराच्या तळमजल्याचे 80 टक्के बांधकाम पूर्ण, पहा Photos

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.