Navneet Rana Bullet Ride: जय श्रीरामचा नारा; नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड, पहा व्हिडिओ - आमदार रवी राणा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 30, 2023, 10:31 AM IST

अमरावती: हम अखंड ब्रम्हांड के राजा श्रीराम के भक्त है ना, हार की फिक्र करते है, ना जितका जिक्र करते है,. असे म्हणत जय श्रीरामाच्या घोषणा देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज सकाळी शहरातील छत्री तलाव परिसरात बुलेट सवारी केली. काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करून डोक्यावर भगवा दुपट्टे बांधून, नवनीत राणा आज बुलेटवर छत्री तलाव परिसरामध्ये असणाऱ्या जंगलाच्या दिशेने बुलेटने निघाल्या. बुलेट चालवताना त्यांनी जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या.  एका ठिकाणी थांबून त्यांनी हम अखंड ब्रह्मांड के राजा श्रीराम के भक्त है, असे म्हणत रामनवमीच्या शुभेच्छा अमरावतीकरांना दिल्या.


हनुमान जयंतीला मोठा उत्सव: हनुमान जयंतीच्या पर्वावर शहरातील छत्रीतला परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते  हनुमानाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्यात हनुमान चालीसा पठण देखील केले जाणार आहे. हनुमान चालीसा पठाण सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना चांदीचा शिक्का आणि हनुमान चालीसाचे पुस्तक दिले जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर हनुमान जयंतीच्या तयारी संदर्भात खासदार नवनीत राणा यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. हिंदू शेरनी असा उल्लेख असणारे बॅनर देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हे पोस्टर लवकरच अमरावती शहरात विविध चौकात झळकणार असल्याची माहिती समर्थकांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.