Sri Ram Navami Celebration at Pune : तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात रामजन्म सोहळा उत्साहात; भक्तांची तुडुंब गर्दी - Sri Ram Navami Celebration at Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 30, 2023, 5:59 PM IST

पुणे : बाळा जो जो रे... दशरथ नंदना... बाळा जो जो रे... चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पुण्यातील पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिर निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाटात साजरा झाला. आज दुपारी या मंदिराबरोबर १२ वाजून ४० मिनिटांनी सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा नामघोष करीत रामभक्तांनी फुलांची उधळण करीत श्रीरामजन्म सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवला. पुण्यातील तुळशीबाग येथील श्रीरामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी या पेशवेकालीन मंदिरात आकर्षक पुष्पसजावट व विविधरंगी लाईटची विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूकदेखील काढण्यात आली. कीर्तन व पाळणा म्हणजेच रामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठ्या प्रमाणावर मोठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.