Raksha Bandhan 2023 : शिर्डीत साईंच्या मूर्तीला राखी बांधून रक्षाबंधन साजरे... पहा व्हिडिओ - Rakhi Purnima

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 3:21 PM IST

Updated : Aug 30, 2023, 5:35 PM IST

अहमदनगर (शिर्डी) : बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. रक्षाबंधनानिमित्त ( Raksha bandhan 2023 ) शिर्डीतही साईबाबांच्या मूर्तीला मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. अनेक साईभक्तांनी आज साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. अनेक महिला शिर्डीच्या साईबाबांना आपला पाठीराखा बंधू मानतात. त्यामुळे आज शिर्डीतही साईबाबांच्या मूर्तीला मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. आज पहाटेच्या काकड आरती नंतर बांबाना मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर साई मूर्तीला भरजरी वस्त्र नेसवण्यात आलं. त्यानंतर सुंदरशी मोठी राखी बाबांच्या संगमरवरी मूर्तीच्या हातात बांधण्यात आली. त्यानंतर दुपारची आरती पार पडली. साई रुपी भावाचा निराळ्या मायेचा झरा, कायम असाच भरलेला वाहत राहो हीच प्रार्थना अनेक भक्तांनी केली आहे. शिर्डीत साईबाबा होते तेव्हा शिर्डीतील महिला बाबांना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायच्या. आज ही परंपरा साई संस्थान आणि भाविकांकडून सुरू आहे.

Last Updated : Aug 30, 2023, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.