Ashadhi Ekadashi 2023: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या भूमीतून हरिनामाचा गजर; 43 वर्षापासून रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी - छत्रपती शिवाजी महाराज

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 27, 2023, 11:25 AM IST

पुणे : 'भेटी लागी जीवा लागली आस' अशी स्थिती आता प्रत्येक वारकऱ्याची झालेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत जगद्गुरु तुकोबा महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे येणार आहे. प्रत्येक वारीमध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर होत असतो. परंतु स्वराज्याचे आदर्श राजे, हिंदुत्वाचे आदर्श राजे, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा सुद्धा जयघोष करणारी एक वारी दरवर्षी पंढरपुरात येत असते. रायरेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्या रायरेश्वर किल्ल्यावरून ही वारी दरवर्षी पंढरपूरला येते. गेले 43 वर्ष हा वारीचा अखंड प्रवास सुरू आहे. 22 दिवस पंढरपूरमध्ये वारी दाखल होण्यासाठी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास आणि ज्ञानोबा तुकोबाच्या आध्यात्म्याचा इतिहास याची सांगड घालण्याचे प्रतीक म्हणून या वारीकडे बघितले जाते. या वारीमध्ये रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिकात्मक शपथ घेतलेला देखावा उभारण्यात आला आहे. त्याच्या पाठीमागे संत ज्ञानेश्वरांचा मोठा फोटो आहे. आज वारीचा मुक्काम वाखरीत आहे. भारताचा इतिहास सर्वमान्य अध्यात्म आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा पाया आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांच्या संतांची शिकवण यावरच महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कार घडत गेलेले आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचा इतिहास जपत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा अध्यात्मावरला गाडा विश्वास पाहता, ही वारी सुरू करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.