Video रेल्वे रुळ तुटल्याने अपघात.. मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले! - तुटलेला रेल्वे रुळ
🎬 Watch Now: Feature Video
उत्तर प्रदेशातील झाशी येथे झाशी-कानपूर रेल्वे मार्गावर मालगाडीचे Jhansi Railway Station पाच डबे रुळावरून Railway Track Broken घसरले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे. यामुळे रेल्वेमार्गाच्या सेवेवर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत सुरू करण्यावर ते भर देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST