तब्बल 20 मिनिटे रोखली डेक्कन क्वीन; लोणावळ्यात स्थानिकांकडून रेल रोको आंदोलन - डेक्कन क्वीन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 12, 2024, 11:29 AM IST
पुणे : पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा, या मागणीसाठी स्थानिकांकडून लोणावळा येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखली. आंदोलक रेल्वे रुळावर उतरले होते. डेक्कन क्वीनपासून आंदोलक बाजूला होत नसल्यामुळे रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरीदेखील स्थानिकांनी रेल्वे रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. डेक्कन क्विन रोखल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्या काही काळ उशिराने धावल्या. या आंदोलनाचा लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही.