Vikhe Patil Criticizes Mahavikas Aghadi : विरोधकांचे बाहेरून कीर्तन आतून तमाशा, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका - विरोधकांची एकजूट
🎬 Watch Now: Feature Video

अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधक बाहेरून कीर्तन आतून तमाशा करतात असे टीकास्त्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर सोडले आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नाही. ते सत्तेसाठी एकत्र आल्याचा घाणाघात विखे पाटील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जगात उंचावत चालली आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. विरोधकांना आपले स्वतःचे दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे, म्हणून ते एकत्र येत आहेत असा प्रहार पाटील यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांनी शरद पवारांविषयी काय उद्गार काढले आहेत. तसेच केजरीवाल यांच्या विषयी उद्धव ठाकरे यांनी काय उद्गार काढले आहेत, ते जरा तपासा विरोधकांनी तपासायला हवे. विरोधकांचे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा सरु आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.