Pune Shops Fire: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे दुकानांना आग, 3 दुकाने आगीत भस्मसात - Pune Crime
🎬 Watch Now: Feature Video
Pune Shops Fire: पुण्यातील सिंहगड रोडवरील किरकटवाडी फाटा जवळ अनाधिकृत दुकानांना मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळ अनधिकृत दुकानांना आग लागल्याची घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गॅसगळतीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये श्रीनाथ स्विट होम, महाराष्ट्र मटन शॉप व सायबा अमृततुल्य या दुकानांचे नुकसान झाले आहे. ही सर्व दुकाने केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST