Madhe Ghat Waterfall Video: पाहा, ड्रोनच्या साहाय्याने टिपलेली मढे घाटातील धबधब्याची मनमोहक दृश्ये
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पावसाळ्यात निसर्गाचे रुप उजळून निघते. पाऊस आणि धबधबा हे समीकरणच वेगळे आहे. पर्यटकांची धबधब्यांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाच्या या संततधारेमुळे, वेल्हा तालुक्यातील धबधबे झाले प्रवाहीत झाले आहेत. तोरणा किल्लाचा परिसर असणाऱ्या मढे घाटातील प्रसिद्ध धबधबा प्रवाहीत झाला आहे. पावसाळ्यामुळे मढे घाटाचे सौंदर्य खुलले आहे. धबधबा आणि घाटाचे खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहे. निसर्गाचे हे रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटत आहेत. दरम्यान पावसाळ्यात पर्यटकांना सातत्याने खुणावणाऱ्या वेल्हे तालुक्यातील मढे घाटातील प्रवाहीत झालेल्या प्रसिद्ध धबधब्याची ड्रोनच्या साहाय्याने ही मनमोहक दृश्य टिपलेली आहेत.