Conjunctivitis In Alandi: आळंदीमध्ये डोळ्यांच्या बुबुळाचा प्रादुर्भाव, 4 दिवसांत समोर आली 1560 प्रकरणे - डोळ्यांच्या बुबुळाचा प्रादुर्भाव

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 21, 2023, 2:08 PM IST

पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांच्या बुबुळाच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आळंदीतील विविध संस्थानात राहणाऱ्या मुलांची सर्वाधिक प्रकरणे समोर आहेत. गेल्या 4 दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने वारंवार तपासणी केल्या जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पावसाळ्यात विविध प्रादुर्भाव होत असतात. पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेच्या हद्दीत गेल्या चार दिवसांपासून डोळ्यांच्या बुबुळाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. सोमवारी डोळ्यांच्या बुबुळांची 450 प्रकरणे समोर आली. त्यानंतर मंगळवारी 740 प्रकरणे, बुधवारी 210 प्रकरणे आणि गुरुवारी 160 प्रकरणे समोर आली आहे. या चार दिवसांत एकूण 1560 प्रकरणे आढळून आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आळंदी नगर पालिकेच्या हद्दीत जे विविध शैक्षणिक संस्था आहे. त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या बुबुळांचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. जिल्हा प्रशासनासमोर जेव्हा हा प्रकार आला, तेव्हा तात्काळ याची दखल घेण्यात आली आहे. सर्वांची तपासणी करण्यात आली आहे.आज एनआयवीचे एक पथक सिव्हिल सर्जनसह आळंदीला भेट देणार आहे. तसेच पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, असे यावेळी आयुष प्रसाद म्हणाले. आज आढळलेल्या नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली नाही, तर आम्ही शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देऊ. तसेच पिंपरी चिंचवड आणि लगतच्या ग्रामपंचायतींनाही सर्व घरांची तपासणी करण्यास सांगितले आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मुलांना केस पेपर फ्री केले आहेत. संस्था प्रमुखांना मुलांना घरी पाठवण्याबाबत बोललो आहोत, असे ते म्हणाले. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.