Pune metro: येरवडातील मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही - पुणे मेट्रो सुरू होण्याची तारीख
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: पुण्यातील येरवडा भागात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कारवर कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली अआहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथे मेट्रो स्टेशनच काम सुरू आहे. मेट्रोच्या पुलाखालून एक कार जात होती. त्यावेळी त्या कारवर लोखंडी भाग कोसळला. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी केली जात आहे. मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग एका कारवर पडला. त्यावेळी जर तेथे कोणी नागरिक असते तर दुर्दैवी घटना घडली असती. महामेट्रोने येरवडा येथे सुरू असलेल्या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी केली जात आहे.