Pune Crime News : पुण्यात तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांचे अफिम जप्त
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाचे सेवन तसेच विक्रीत वाढ होताना दिसत आहे. आता पुण्यातील उच्चभ्रू अशा लोहगाव भागातून तब्बल 1 कोटी १० रुपयांचे अफिम अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. राजस्थानच्या ३२ वर्षीय व्यक्तीकडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे अफिम जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुलकुमार भुरालालजी साहु याला अटक केली आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती हा लोहगाव भागात असलेल्या पोरवाल रोड येथे एका सोसायटी समोर आला असून त्याच्याकडे अमली पदार्थ आहे. यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळ ५ किलो ५१९ किलोग्रम (१ कोटी १० लाख रुपय) एवढा अफिम आढळून आला. तर हा अमली पदार्थ तो कोणाला विकणार होता याचा शोध सुरू आहे. लोहगाव हा भाग पुण्यातील एक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. अनेक प्रसिद्ध आणि नामांकित महाविद्यालये या भागात आहेत. त्यामुळे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.