EXCHANGE OF 2000 NOTE : दोन हजार रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू, ग्राहकांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर, दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आजपासून त्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन हजार रुपयांची नोट बदलून घेण्याकरता ग्राहकांची बँकेत यायला सुरुवात झाली आहे. मात्र, ग्राहकांची संख्या फारच अत्यल्प दिसून येत आहे. 2 हजारांची नोट मशीनमध्ये डिपॉझिट होत असल्याने ग्राहकांना कोणताही त्रास होतं नसल्याचं चित्र आहे. सकाळी दहा वाजता बँक उघडल्याबरोबर नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागपूर आतील सरकारी आणि खाजगी बँकेत नोटा बदलून घेण्याकरता ग्राहक येण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक दोन हजार रुपयांची नोट थेट बँकेत जमा करणे ऐवजी पेट्रोल पंप भाजी विक्रेते किंवा फळ विक्रेत्यांकडे खर्च करत असल्याचं दिसून येत आहे. नोट बदलण्याची प्रक्रिया पुढील चार महिने सुरू राहणार असल्यामुळे ग्राहक कोणतीही घाई करत नसल्याचं चित्र आहे. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली आहे.