चक्क उड्डाणपुलाखाली अडकले विमान, फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - मुझफ्फरपूर
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 30, 2023, 1:09 PM IST
मोतिहारी (बिहार) Plane Stuck Under Flyover : बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील पिप्रकोठी चौकात विमान घेऊन जाणारा एक ट्रक ओव्हरब्रिजच्या खाली अडकला. त्यामुळं रस्त्यावर गोंधळ निर्माण झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी उड्डाणपुलाखाली अडकलेल्या विमानाचे फोटो घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. या गर्दीमुळं राष्ट्रीय महामार्गवर 3 ते 4 तास वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत झालेल्या लिलावात एका व्यावसायिकाने हे विमान विकत घेतलं होतं. एका मोठ्या ट्रकमध्ये ते मुंबईहून आसामला नेलं जात आहे. पिपराकोठी येथे, NH 28 वरील गोपालगंजकडून येणाऱ्या वाहनांना ओव्हरब्रिज ओलांडून मुझफ्फरपूरच्या दिशेने जावं लागतं. विमान घेऊन जाणारा ट्रक पिप्रकोठीजवळील ओव्हरब्रिजच्या खाली जात असताना विमानाचा वरचा भाग ओव्हरब्रिजखाली अडकला. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर या विमानाला बाहेर काढण्यात आलं.