Snake Couple Romance In Buldana : गावाशेजारी रंगली सापांची प्रणयक्रीडा, गावकऱ्यांनी केली तुफान गर्दी - साप
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा : सध्या सापांचा प्रणयकाळ सुरू असून अनेक ठिकाणी साप प्रणयक्रीडा करताना दिसून येत आहेत. चिखली तालुक्यातील कोलारा येथेही नागरिकांना दोन भलेमोठे साप प्रणयक्रीडा करताना आढळून आले. यावेळी नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. हे साप कोलारा येथील समाधान सोळंकी यांच्या गोठ्याजवळ काही तरुणांना साप प्रणयक्रीडा करताना आढळून आले होते. बराच काळ या सापांच्या जोडीची प्रणायक्रीडा चालू होती. कोलारा येथील नागरिकांना ही जोडी प्रणयक्रीडा करताना दिसल्यानंतर प्रणयक्रीडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रणयक्रीडा झाल्यावर दोन्ही साप रानात निघून गेले. मात्र यामुळे परिसरातील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. काही नागरिकांनी या प्रणयक्रीडेचे व्हिडिओ काढून आपल्या मोबाईलमध्ये ठेवले. यावर्षी अवकाळी पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्यामुळे नागराज जून जुलैनंतर दिसण्याऐवजी आता एप्रिल महिन्यातच त्यांच्या बिळातून बाहेर येऊन आपले चमत्कार दाखवत आहेत. दुसरीकडे सापाच्या प्रणयक्रीडेबाबत आजही अनेक अंधश्रद्धा सांगितल्या जातात.
हेही वाचा - Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा 780 गावांना फटका, 65 हजार शेतकऱ्यांचे नुकसान