Pankaja Munde : वाद मिटला! ताईंनी औक्षण करून दिल्या मंत्री धनंजय मुंडेना शुभेच्छा! - पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-07-2023/640-480-18938395-thumbnail-16x9-munde.jpg)
बीड - राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण भाऊ एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र आता धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण करत अभिनंदन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्राचे मंत्री झाल्याबद्दल पेढे भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा ताईंनी आज माझे औक्षण केले हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आमचे बहीण-भावाचे नाते हे असेच कायम अबाधित आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. पंकजा मुंडे यांनी नुकताच दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.