Online Passport Apply : घरबसल्या केवळ 15 मिनिटात भरा पासपोर्टसाठी अर्ज; पाहा व्हिडिओ - Demand for Passport
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 18, 2023, 10:07 PM IST
पुणे : Online Passport Apply : सर्वात महत्त्वाचं आणि खूपच किचकट प्रक्रिया समजल्या जाणाऱ्या पासपोर्टसाठी (Passport) आता नागरिकांना अनेक सोयी, सुविधा या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पूर्वी अनेक कागदपत्र हे पासपोर्ट बनविण्यासाठी लागत होते. मात्र, आता पासपोर्ट कार्यालयातून (Passport Office) नागरिकांना अनेक सोयी उपलब्ध करून दिल्यानं कमीत कमी कागदपत्रांद्वारे नागरिकांना पासपोर्ट काढता येणार आहे. तसेच आता पासपोर्ट कढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे विभागात यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे पासपोर्ट काढण्यात आले आहेत. यंदा पुणे विभाग पासपोर्ट बनविण्यात उच्चांक गाठणार असल्याचा विश्वास, पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जुन देवरे (Passport Officer Arjun Deore) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.
अशा प्रकारे पासपोर्ट बनवू शकता : पासपोर्ट बनविण्यासाठी कमीत कमी डॉक्युमेंट लागणार आहेत. याबाबत देवरे यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षात पासपोर्ट बनविण्याची प्रक्रिया ही खूप सोप्पी करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकता. जन्म दाखला, पॅनकार्ड, लायसन्स, बँक पासबुक, तसेच लहान मुलांसाठी आई-वडिलांची संमती अशा कमीत कमी कागदपत्रांच्या माध्यमातून पासपोर्ट बनवू शकता. त्यामुळे पासपोर्ट बनविण्याची प्रक्रिया ही अधिकच सोप्पी झाली आहे.