Maharashtra Onion To Manipur : मनमाडचा कांदा पोहचला हिंसाचारग्रस्त मणिपूरला - मनमाडचा कांदा पोहचला हिंसाचारग्रस्त मणिपूरला
🎬 Watch Now: Feature Video
मनमाड (नाशिक) : मनमाडचा कांदा हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूरला पोहचला असून जवळपास 800 टन कांदा घेऊन 22 डब्याचा रॅक मणिपूरच्या खोंगसोंगला या स्थानकावर पोहचला आहे. कडक सुरक्षेत हा कांदा उतरवण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने या कांद्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना आधार मिळणार आहे. मणिपूर तेथील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वेगवेगळ्या राज्यातून जीवनावश्यक वस्तू मणिपूरला पाठविल्या जात आहेत. नाशिक जिल्हा कांद्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे मनमाडच्या अंकाई रेल्वे स्थानकावरून मालगाडीद्वारे 800 टन कांदा पाठविण्यात आला आहे. तब्बल 2801 किमी अंतर कापून 22 डब्यांची मालगाडी 800 टन कांदा घेऊन मणिपूरच्या खोंगसोंग येथे पोहचली आहे. तेथे कडक सुरक्षेत कांदा उतरविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. देशभरातून मणिपूरला मदत करण्यासाठी लोक सरसावले असून अनेक राज्यातील सरकारने मणिपूरला विविध वस्तू मदत स्वरूपात पाठविल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून अनेक जणांचे यात प्राण गेले आहेत. यामुळे येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.